kalyan crime  saam tv
क्राईम

Kalyan Crime : कल्याण स्टेशन परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या गँगची पोलिसांनी काढली धिंड

कल्याण शहरात 'डॉन' बनून स्वतःची दहशत निर्माण करू पाहणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. चाकूचा धाक दाखवून निष्पाप नागरिकांना लुटणाऱ्या या गुंडांना अटक करून पोलिसांनी भररस्त्यात त्यांची जाहीर धिंड काढली.

Saam TV News

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. गुन्हेगारांनी उघडपणे दहशत माजवत आणि चाकूचा धाक दाखवून तसेच जबर मारहाण करत तब्बल चार नागरिकांना लुटल्याचा प्रकार घडला. या लुटमारीच्या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ३० मिनिटांत तीनही आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन परिसरातील गजबजलेल्या परिसरात तीन आरोपींनी चार नागरिकांना गाठले. आणि त्यांना धारदार चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या नागरिकांकडून आरोपींनी रोख रक्कम आणि चार महागडे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. मारहाणीचा आणि लुटमारीचा हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महात्मा फुले पोलिसांची धडक कारवाई

घटनेची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळाराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके आणि त्यांच्या टीमने अवघ्या ३० मिनिटांच्या आत आरोपींचा शोध काढून त्यांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आवेश मोमीन उर्फ मुर्गी, समीर पानसरे आणि अल्ताफ शेख अशी आहेत.

गुन्हेगारांची काढली धिंड

नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या तीन्ही आरोपींची कल्याण स्टेशन परिसरातून भरवस्तीत धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईचे कल्याणकरांकडून विशेष कौतुक केले जात असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Bank : बँक खात्यातून पैसे कट झाले, पण SMS आलाच नाही; SBIला व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश

MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही, फडणवीसांनी सांगितलं कारण...VIDEO

Maharashtra News Live Update: दुष्काळाला कंटाळून पंढरपूरच्या करमाळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Pune Election: पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणूक होणार चुरशीची; कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार रिंगणात, कसं असेल लढतीचं चित्र? वाचा

भाजपचा दणदणीत विजय, विधानसभा पोटनिवडणुकीच्या २ जागांवरही 'कमळ' फुललं

SCROLL FOR NEXT