kalyan railway station
kalyan railway station Saam tv
क्राईम

Kalyan Crime News : मित्राच्या बायकोला का बघतोय? असा जाब विचारल्याने दोघांवर हल्ला; रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख, कल्याण

मित्राच्या बायकोला का बघतोय? असा जाब विचारल्याने संतापलेल्या तरुणाने जाब विचारणाऱ्या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केलाय. कल्याण रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडलीये. सदर घटनेत कल्याण जीआरपी पोलिसांनी अरुण कांबळे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याण रेल्वेस्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास काही जण उभे होते. एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता. हे बघून दिवा खेतकर या 28 वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय? असे विचारले.

समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की, आपल्या जवळ असलेलं धारदार शस्त्र काढून दिवा या तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात दिवाच्या मानेवर जखमा झाल्या. यावेळी दिवाला वाचवण्यासाठी गेलेल्या राजूवर देखील या व्यक्तीने हल्ला केला. कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुणला अटक केलीये.

अरुण चंदन नगर खडवली येथील राहणारा आहे.अरुणला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. कल्याणमधील गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अगदी शुल्लक कारणावरून देखील व्यक्ती लगेचच एकमेकांच्या जिवावर उठतायत.

नाचण्यावरून वाद झाल्याने मित्राची हत्या

बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. एका तरुणाने मिरवणुकीत नाचताना धक्का मारल्याने आणि नाचण्यासाठी जागा न दिल्याने त्याच्या मित्राला प्रचंड राग आला. रागाच्याभरात त्याने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT