Kalyan Crime News Saam TV
क्राईम

Kalyan Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला... कल्याणमध्ये तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त; कोळशेवाडी पोलिसांची कारवाई

Kalyan Latest News: या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी सह त्याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, कल्याण| ता. २८ डिसेंबर २०२३

Kalyan Crime News:

कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरात छापा टाकून तब्बल 7 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी सह त्याचे दोन साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

कल्याणमध्ये मोठी कारवाई

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्वेकडील (Kalyan West) विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत बेकायदेशीरित्या गुटख्याची खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती होती.

सात लाखांचा गुटखा जप्त..

या माहितीच्या आधारे कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस अधिकारी उल्हास जाधव, दिनकर पगारे यांच्या पथकाने गायकवाड चाळीतील खोलीत छापा टाकला. खोलीत तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी गुटखा जप्त केला असून याप्रकरणी मनीष यादव ,इसरार अहमद, विनोद गंगवाणी सह त्याचे दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील मनीष यादव हा मुख्य सूत्रधार असून त्याचे साथीदार पसार आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून आणला? याची कुठे विक्री होणार होती? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT