CCTV Footage Saam TV
क्राईम

CCTV Footage : देवीच्या दारी आले, नतमस्तक झाले अन् चांदीच्या पादुका चोरुन फरार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Crime News : शुक्रवारी दुपारी दुपारी कचोरे गावदेवी मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा आत शिरला. त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan :

आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध संकटांना समोरे जाताना प्रत्येक व्यक्ती देवाचे नामस्मरन करतो. मोठी घटना घडल्यास देव त्यांना त्यांची शिक्षा देईल असं अपसुकच आपल्या तोंडून निघतं. मात्र कल्याणमध्ये चोरट्यांना देवाची देखील भीती उरलेली नाही, अशीच एक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातून चोरी केली आहे.

कल्याण पूर्वेकडील कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी काल दुपारी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीतील पादुका चोरून नेल्या आहेत. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शुक्रवारी दुपारी दुपारी कचोरे गावदेवी मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा आत शिरला. त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला. मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धुम ठोकली.

या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30 हजार रुपये इतकी आहे. संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे आढळले. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT