Kalyan Crime News Saamtv
क्राईम

Kalyan Crime: माजी कुलगुरुंना निलंबित शिक्षकासह ५ जणांकडून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर

Kalyan Crime: पोलिसांनी मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षक संजय जाधव याच्यासह तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

kalyan Crime News:

माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या बंगल्यात घुसून निलंबित शिक्षकाने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केल्याची कल्याण कर्णिक रोड परिसरात घडली. या प्रकरणी खासगी शिक्षण मंडळाचे निलंबित शिक्षक संजय जाधव याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

तक्रारदार अशोक प्रधान हे कल्याणमधील (Kalyan) छत्रपती शिक्षण मंडळाच्या संस्थेचे अध्यक्ष असताना शाळेतील गैरवर्तुणुकीवरून संजय जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. त्याचा राग जाधव यांच्या मनात होता. रविवारी संध्याकाळी संजय जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रधान यांच्या कर्णिक रोडवरील घरी आले. जाधव यांच्यासोबत अन्य तीन जण आणि एक महिला होती.

सुरूवातीला संजय जाधव यांनी प्रधान यांना आपली नोकरी गेल्याने आपली परिस्थिती खूप हलाखीची झाली असून तुमच्या शिफारशीने पुन्हा नोकरी देण्याची विनंती केली. त्यावर अशोक प्रधान यांनी समजावले की माझा आता सदर संस्थेमध्ये काही एक संबंध नाही, असे बोलून नकार दिला. आपण काही करू शकत नाही, असे सांगून मदत करण्याचे टाळले असता त्याचा राग आल्याने संजय जाधव यांच्यासह चार जणांनी अशोक प्रधान यांना बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर आत काय घडले आहे याचा कुणाला थांगपत्ता लागू नये यासाठी आरोपींनी बंगल्याच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावून तेथून पळ काढला. काही वेळाने प्रधान यांच्या घरी मोलकरणीचे काम करणारी महिला घरी आली, ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी अशोक प्रधान यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षक संजय जाधव याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT