Kalyan Crime News Saam TV
क्राईम

Kalyan Crime News: रेल्वे रुळावर अर्धवट जळालेला मृतदेह; कल्याण पत्रिपूल परिसरातील खळबळजनक घटना

Crime News: या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात येतोय. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan Crime News:

कल्याण पूर्वेकडील पत्रिपूल परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. रेल्वे रुळालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आलाय. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात येतोय. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मयत व्यक्ती कोण आहे? ही घटना कशी घडली? या प्रश्नांची उत्तरे टिळक नगर पोलीस शोधत आहेत. कल्याण पूर्वेकडे पत्रिपूल परिसरातील अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी रुळांलगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला. याबाबत रेल्वे पोलिसांनी टिळक नगर पोलिसांना माहिती दिली. टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय.

सदर मृतदेह ३५ ते ४० वर्षांच्या इसमाचा असून मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात येतोय. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संबंधित व्यक्ती आसपासच्या परिसरात राहणारा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर घटनेमुळे रेल्वे ट्रॅक आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

Rangoli Designs For Diwali: दिवाळीला घराच्या दाराभोवती काढा 5 सोप्या रांगोळ्या, घराची शोभा वाढेल

सावकारांची फायनान्स दुकानं लोकांनी फोडली; नांदेडमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

गोकुळच्या संचालकांनो, हजर व्हा! कोल्हापूर सर्किट बेंचचा महायुतीला झटका

SCROLL FOR NEXT