Crime News  Saam TV
क्राईम

Kalyan Crime News: गाडीला चावी पाहिली, चोरीचा मोह झाला अन् फसला; महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड

Kalyan Latest News: अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १६ फेब्रुवारी २०२४

Kalyan Crime News:

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चिन्मय तलावडे असे या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी, एक होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तपास करताना ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीसांच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी कल्याण पूर्व परिसरात सापळा रचला होता.

यासाठी कल्याण पूर्व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी एक दुचाकी चावी लावून उभी केली होती. यावेळी एक संशय इसम त्या ठिकाणी आला. बाईकला चावी लागलेली पाहताच त्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या पथकाने तात्काळ झडप घालत या चोरट्याला अटक केली चौकशी दरम्यान त्याचे नाव चिन्मय तलावडे असल्याचे समोर आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, चिन्मय तलावडे हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या ,दुचाकी चोरी करायचा. त्याने या आधी देखील अशाच प्रकारे अनेक बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून कोळशेवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT