नव्याने बांधलेल्या गोदामात विद्युत मीटर बसविण्याकरीता अतिरिक्त 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना मानवत येथील महावितरण कंपनीच्या शहर शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश किसनराव भोपे (ganesh bhope) (वय 33) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau) एका पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागास एका नागरीकाने तक्रार दाखल केली हाेती. त्यावर एसीबीने कार्यवाही केली. (Maharashtra News)
कृषि साहित्य साठवण्याकरीता तक्रारदाराने मानवत येथे नवीन गोदाम बांधले. त्या गोदामात विद्युत मीटर बसविण्यासाठी महावितरण कंपनीच्या मानवत कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे व शुल्कसुध्दा भरले.
परंतु, शासकीय शुल्क भरुनही विद्युत जोडणी व विद्युत मीटर बसवून मिळत नसल्यामुळे आपण 9 फेबुरवारी रोजी महावितरण कंपनीशी संपर्क साधला. विनंती केली. त्यावेळी अतिरिक्त तीन हजार रुपये लागतील, असे संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञाने सुनावले. आपण आपली लाच द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रार करतो आहोत, असे नमूद केले.
वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश भोपे याने विद्युत जोडणी आणि विद्युत मीटर बसविण्याकरीता तडजोडीअंती दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने बुधवारी पंचासमक्ष गणेश भोपे यास पकडले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर निलपत्रेवार, अतूल कदम, जिब्राहिल शेख, कल्याण नागरगोजे, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली असून मानवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.