jintur police arrests 4 in srpf jawan hitting case Saam tv
क्राईम

SRPF जवानाची किरकाेळ कारणावरून निर्घृण हत्या; किरकोळ कारण, पण घडलं भयंकर

Parbhani Latest Marathi News : एसआरपी जवान हा काही दिवसांपूर्वीच गावाकडे सुट्टीवर आला असता त्याच्या खूनाची घटना घडल्याने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजेश काटकर

Parbhani :

किरकाेळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात घडली. अजगर खाजा शेख (वय 33) असे मृत जवानाचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी पाेलिसांनी चाैघांना अटक केल्याची माहिती परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसींग परदेशी यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : अजगर खाजा शेख हे सकाळी नाष्टा करण्यासाठी जिंतूर शहरातील एका हॉटेल मध्ये गेले होते. नाष्टा लवकर देण्याच्या वादावादीत हॉटेल मालक व अजगर खाजा यांचा वाद झाला.

त्यात हॉटेल मालक शेषेराव आव्हाड व त्याचा मुलगा अमोल तसेच हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांनी अजगर खाजा यांना लाकडी दाड्यांनी बेदम मारहाण केली. त्यात खाजा यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या गुन्हा नाेंदवीत त्यांना अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत शेषेराव आव्हाड, अमोल आव्हाड, बालाजी रणखंबे, इम्रान करेशी अशी अटक केल्यांची नावे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

मुंबई लोकलमध्ये 'रडू नको बाळा…'वर तरुणीचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT