Jharkhand Murder Saam Tv
क्राईम

Jharkhand Murder : श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती, प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून मृतदेहाचे केले 40 तुकडे

डुमरी (झारखंड) : झारखंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीये. यामध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे 40 तुकडे केले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

झारखंडमध्ये (Jharkhand Murder) माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक भयानक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे 40 तुकडे करून जंगलात फेकून दिले. या क्रूर घटनेने स्थानिकांमध्ये संताप निर्माण केला आहे.

2022 मध्ये दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्त्याकांडाची ही पुनरावृत्ती आहे. प्रियकर आफताब याने त्याची प्रेयसी श्रद्धाची हत्त्या करून शरीराचे तुकडे केले होते व वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते.  झारखंडमधील डुमरी जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण व पीडिता गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. काही मतभेदांमुळे आरोपीने पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर, आरोपीने मृतदेहाचे 40 तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे सापडले, ज्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. या क्रूर कृत्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे आणि महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.

छत्तीसगडमधील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराची घटना

ही घटना छत्तीसगडमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणाची आठवण करून देते, जिथे एका अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षक आणि इतर काही सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत विद्यार्थिनीला या अमानवीय कृत्याचा बळी बनवले. तीचा व्हिडिओ बनवून तीला वारंवार ब्लॅकमेल देखील केले जात होते. या घटनेनेही संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या दोन घटनांनी देशातील महिला सुरक्षेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एकीकडे समाजातील काही घटक मुलींसाठी शिक्षण व स्वातंत्र्याचा दावा करतात, तर दुसरीकडे अशा घटना महिलांच्या सुरक्षिततेच्या वास्तवाला दर्शवतात. सरकारने आणि समाजाने एकत्रितपणे यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

महिलांसाठी सुरक्षितता, शिक्षण आणि तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी प्रणाली निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या घटना देशातील महिला सुरक्षेच्या पायाभूत रचनेतील त्रुटी दाखवतात आणि यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी आणि जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT