क्राईम

Crime News : बापरे! समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त

jalna crime news : समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांंच्या गुन्हे शाखा पथकाने १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

Vishal Gangurde

अक्षय शिंदे. साम टीव्ही

जालना : जालन्यातील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. जालन्यात तब्बल कंटेनरसह एक कोटींचा गुटखा जप्त केला आहे. जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरला रात्र वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीकडून मुंबईकडे हा कंटेनर जात होता. यामध्ये 180 गोण्या गुटख्याच्या आढळून आल्या. वाहनासह एकूण 1 कोटी 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यामध्ये 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापुढेही अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील, असं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितलं.

कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले

जालन्यातील कडवंची शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कंटेनरसह तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहेत.

यापुढे देखील मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.

कंटेनरसह 3 संशयित आरोपी ताब्यात

जालना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनरसह तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

SCROLL FOR NEXT