Washim Crime : रिसोडमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Washim News : गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. असाच प्रकार वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे झालेल्या कारवाईनंतर समोर आला आहे.
Washim Crime
Washim CrimeSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईनंतर गर्भपात करण्यासाठी काम करणारे संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. तर सदर कारवाईत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गर्भलिंग निदान व गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र छुप्या पद्धतीने काही दवाखान्यांमध्ये गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. असाच प्रकार वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे झालेल्या कारवाईनंतर समोर आला आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभाग व पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

Washim Crime
Bogus Police Certificate : बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन एजंट विरोधात गुन्हा दाखल

औषधीसह साहित्य जप्त 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार आरोग्य विभागाकडून रिसोड येथील शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत बुलढाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधं आणि साहित्य जप्त करण्यात आले. 

Washim Crime
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दोन वर्षांत १४० अपघात; २३३ जणांचा झाला मृत्यू

मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

दरम्यान शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूती गृह केंद्रावर झालेल्या घटनास्थळी डॉ. अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com