Police Constable Killed  Saam Tv
क्राईम

Jalgaon Crime News: धक्कादायक! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराची हत्या

Police Constable Killed In Jalgaon: जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराची हत्या झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Police Constable Killed In Dispute Over Cricket

प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात एका पोलीस हवालदाराची हत्या झाली आहे. ही घटना जळगावमध्ये (Jalgaon) घडली आहे. कॉन्स्टेबल शुभम अगोणे याच्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या सदस्यांनी तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला केला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. १२ जणांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले म्हणाले, मिळालेल्या माहितीवरून कारवाई केलीय. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनी त्यांना रविवारपर्यंत सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तलवारी आणि क्रिकेट स्टंपने वार

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर पोलीस हवालदाराच्या हत्येत (Crime) झालंय, अशी माहिती संतोष सोनवणे यांनी दिली. मुंबई पोलीस दलातील २८ वर्षीय हवालदार सुभम अगोने यांच्यावर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघातील १० ते १२ जणांनी तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला केला. शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतिस्पर्धी संघातील सदस्यांशी बाचाबाची

आनंद अगोणे याने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२ (खून), ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार दंडनीय गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले सहायक निरीक्षक सागर ढिकले यांनी सांगितले की, शुभम रविवारी त्याच्या गावी होता. ढिकले म्हणाले की, चाळीसगाव येथे क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आले होते. शुभम हा सामना जिंकणाऱ्या संघातून खेळत होता. सामना संपल्यानंतर दुपारी शुभमची प्रतिस्पर्धी संघातील सदस्यांशी बाचाबाची झाली. याचं रूपांतर हाणामारीत (Jalgaon) झालं.

तिघांना अटक

त्यानंतर संध्याकाळी प्रतिस्पर्धी संघातील सदस्यांनी शुभम आणि आनंद (तक्रारदार) यांना वेठीस धरले. त्यांच्यावर स्टंप, तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांनी वार केले आणि ते पळून गेले. शुभमला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलंय. तर आनंदला गंभीर जखमा झालेल्या नाहीत. ढिकले म्हणाले, उपलब्ध माहितीच्या आधारे आम्ही तिघांना अटक केली आहे. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनी त्यांना रविवारपर्यंत सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सुट्टी अखेरची ठरली

मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेला हा तरूण सुट्टीसाठी गावी आला होता. मात्र ही सुट्टी अखेरची ठरली आहे. कारण क्रिकेट खेळताना झालेल्या दोन संघात वादातून त्या पोलीस तरूणावर प्राणघात हल्ला (Jalgaon) झाला. त्याला गंभीर दुखापत झाली, अन त्याने जीव गमावला. रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतलाय. शुभम आगोने हा चाळीसगाव शहारातील रहिवासी होता. त्याचा मृत्यूनं गावात सर्वत्र हळहल व्यक्त होतेय. मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT