Crime News Saam Tv
क्राईम

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Jalgaon Crime: जळगावमध्ये नवऱ्याने बायकोवर जीवघेणा हल्ला केला नंतर स्वत: आत्महत्या केली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये नवऱ्याने बायकोवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारुच्या नशेत या व्यक्तीने बायकोवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने बायकोवर कुऱ्हाडीने वार केला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली. बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात राहणारे आनंदा महारु धनगर (४२ वर्षे) या व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये बायकोवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रेखा धनकर (४२ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या.

बायकोवर हल्ला केल्यानंतर आनंदा धनगरने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रेखा धनगर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदाने पत्नीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

Mumbai Monorail: मुंबईची मोनोरेल का बंद पडली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT