Police investigation reveals a murder conspiracy in Jalgaon where a pickup vehicle was deliberately rammed into the bike of a sarpanch and deputy sarpanch in Chalisgaon taluka. Saam tv
क्राईम

Jalgaon Crime: जळगावात 'खुनी राजकारण'! सरपंच-उपसरपंचाला चिरडण्याचा डाव; सुपारी घेऊन अंगावर घातली पिकअप

Sarpanch Assassination Conspiracy: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सरपंच आणि उपसरंपच्या हत्येचा प्रयत्न झाला. पिकअप वाहनाचा वापर करून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक उटना उघडकीस आली आहे.

Bharat Jadhav

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात खुनी राजकारणाचा खेळ खेळला गेल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील दस्तकेवाडी गावातील सरपंच आणि उपसरपंच या दोघांचाही काटा काढण्यासाठी अपघाताचा बनाव घडवण्यात आल्याची बाब मेहुणबारे पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. राजकीय वर्चस्व आणि जुन्या वादातून या सरपंच-उपसरपंच्या अंगावर पिकअप गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मुख्य सूत्रधारांसह चौघांना जेरबंद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या रात्री हा खूनी खेळ खेळला गेला. दस्तकेवाडीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे दोघे आपल्या बुलेट या दुचाकीवरून चाळीसगावहून गावाकडे जात होते. शिरवाडे शिवारात मेहुणबारे ते शिरवाडे रस्त्यावर समोरून येणारी एक भरधाव पिकअपने त्यांच्या बुलेटला जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली. या धडकेत सरपंच देवरे गंभीर जखमी झाले. सुरुवातीला हा सामान्य रस्ता अपघात असल्याचे भासवण्यात आले.

या घटनेत उपसरपंच ईश्वर अहिरे यांना घातपाताचा दाट संशय आला. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे याप्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विजयकुमार ठाकूरबाड यांनी तपासाचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करत तपास केला. त्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली एक पिकअप वाहन बराच वेळेपासून त्या दोघांचा पाठलाग करत असल्याचं दिसून आले.

पोलिसांनी संशयास्पद पिकअप वाहनाचा मालक लक्ष्मण अशोक महाजन याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला खाक्या दाखवताच. त्यावेळी त्याने या घटनेचा धक्कादायक खुलासा केला. दस्तकेवाडी गावातील राजकीय मतभेदातून सरपंच आणि उपसरपंचांची हत्या करण्याचा कट भिमराव रोकडे आणि इतरांनी रचल्याचा खुलासा केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. भिमराव पांडुरंग रोकडे (रा. दस्तकेवाडी), सचिन भिमराव रोकडे (रा. दस्तकेवाडी), गोविंदा विठोबा माळी (रा. दस्तकेवाडी), लक्ष्मण अशोक महाजन (पिकअप मालक, रा. वाडे, ता. भडगाव) यांना हत्येच्या कटाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या

Sunday Horoscope : पार्टनरला मनातलं सांगून टाका; ५ राशींच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू होणार

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवलं

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी; काही जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

SCROLL FOR NEXT