Maharashtra Crime News Saam Tv
क्राईम

Whatsapp Crime : व्हॉट्सअ‍ॅपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग ठरली घातक! व्यावसायिकाला ४ लाखांचा फटका, नेमकं झालं काय?

Maharashtra Crime News : जळगावातील व्यावसायिकला मोबाईलच्या ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंगमुळे लाखोंचा फटका बसला आहे.त्यांच्या खात्यातील ४ लाख ६४ हजार रुपये गायब झाले. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

Alisha Khedekar

  • जळगावातील व्यावसायिकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर APK फाइल आली आणि ती ऑटो डाऊनलोड झाली

  • फोनचा ॲक्सेस सायबर चोरट्यांनी घेतल्याने व्यावसायिकाच्या खात्यातून ४ लाख ६४ हजार रुपये गायब झाले

  • सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

  • ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा आणि सावध राहा

जळगावमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका व्यवसायिकाला व्हॉट्‌सॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर ठेवणं महागात पडलं आहे. व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल ४ लाख ६४ हजार ४३९ रुपये गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक नीलेश हेमराज सराफ (वर्षे ४९) यांच्या व्हाॅटस्ॲपवर एका फोन नंबरवरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाइल ॲटोमॅटिक डाऊनलोड झाली. आणि खात्यातून ४ लाख ६४, ४३९ रुपये गायब झाले.

फाइल डाऊनलोड होताच फोनचा त्वरित ॲक्सेस मिळतो. सराफ यांच्या फोनमध्ये एपीके फाइल डाऊनलोड होताच अज्ञातने त्यांच्या फोनचा ॲक्सेस मिळवला. त्यामुळे त्याला सर्व खासगी माहिती घेणे सहज शक्य झाले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ हे बँकेत गेले व खाते होल्ड केले. त्यामुळे उर्वरित रक्कम स्थगित झाली.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल वायफायवर असताना ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठेवल्याने हा प्रकार घडला असून, सर्वच मोबाइल ग्राहकांनी आपल्या मोबइलचे सेटिंग तपासणे गरजेचे झाले आहे. दरम्यान सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा जेणेकरून केव्हा कोणती फाइल येईल व ती डाऊनलोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT