Jalgaon Crime News Saam Tv News
क्राईम

Jalgaon News : गाडी जरा बाजूला थांबवा; बाईकवरुन उतरली अन् २० वर्षीय विवाहितेनं नवऱ्यासमोर विहिरीत उडी घेतली

Jalgaon Crime News : या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या २०व्या वर्षी विवाहित महिलेनं नेमकी आत्महत्या का केली असावी? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Prashant Patil

जळगाव : जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकीवर पती-पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मात्र, पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीनेच तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील महेलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) ही दुचाकीने पती अल्ताफ रहमान तडवी (रा. महेलखेडी) याच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान, विरवली गावाजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितलं. दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरडा केला, नागरिकांनी धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढलं. महिलेला वर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या २०व्या वर्षी विवाहित महिलेनं नेमकी आत्महत्या का केली असावी? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पतीने तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT