Crime News : कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कारनामा; महिला कर्मचाऱ्यावर VIP रुममध्ये सातत्याने अत्याचार; पीडितेनं पत्रात काय काय लिहिलं...

Police Officer Rape Female Employee : नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
Police Officer Rape Female Employee
Police Officer Rape Female EmployeeSaam Tv News
Published On

सचिन गाड, साम टीव्ही

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार, दरोडा अशा अनेक घटनांची जणू मालिकाच सुरु आहे. याचदरम्यान, एक धक्कादायक तथा संतापजनक बातमी समोर आली आहे. कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कारागृहाच्या गेस्ट हाऊसच्या व्हीआयपी सूटमध्ये सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे, तसेच संतापाची लाट देखील उसळली आहे.

पीडितेनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र 'साम टीव्ही'च्या हाती लागलं आहे. त्या पत्रात लिहिलं आहे की, 'मी त्यांच्या मुलीच्या वयाची असून सुद्धा, बळजबरीने पदाचा गैरवापर करून त्यांनी सातत्याने बलात्कार' केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. संबधित आरोपी अधिकाऱ्यानं कारागृहाच्या इतरही महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याचा पीडित महिलेनं तक्रारीत आरोप केला आहे.

Police Officer Rape Female Employee
वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

वरिष्ठ अधिकारी इतर महिलांवर कोणत्या नजरेनं पाहतो हे सर्वपरिचित असल्याचा पीडित महिलेनं पत्रात दावा केला आहे. काम करण्यास नकार दिला असता बदली करवून त्रास दिल्याचं देखील महिलेनं आरोप केला आहे. पीडित महिलेनं कारागृह परिसरातील आणि गेस्ट हाऊसचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी केली आहे. इतर महिला घाबरत असल्याचं पीडित महिलेनं दावा या पत्रात दावा केला आहे. तसेच गुप्तचर यंत्रणा आणि सीआयडीकडून (CID) संबंधित अधिकाऱ्यावर पाळत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रार करून महिने लोटले तरी अद्याप कारवाई न झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Police Officer Rape Female Employee
Pune Crime : पाकिस्तानचं लांगुलचालन करणाऱ्या तरुणीची कोर्टात धाव, म्हणते कॉलेजनं मला काढलं; पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com