Bishnoi Gang Threa saam tv
क्राईम

Pune news: पुण्यात पुन्हा बिश्नोई गँगची दहशत? व्यापाऱ्याला थेट २ कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची गंभीर धमकी

Maharashtra crime: पुण्यातील उत्तमनगर परिसरातील व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावाने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली. आठवडाभरातील ही तिसरी घटना असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पुण्यात बिश्नोई गँगच्या नावाने व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गेल्या एका आठवड्यात अशा प्रकारची तिसरी घटना समोर आली असून, यावेळी उत्तम नगर परिसरातील एका बड्या व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी संबंधित व्यापाऱ्याला इंटरनेट कॉलद्वारे धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. तक्रारदार हे उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचं सांगत त्यांच्या बांधकाम व्यवसायाची, कारच्या नोंदणी क्रमांकाची तसंच त्यांच्या रोजच्या हालचालींची संपूर्ण माहिती असल्याचा दावा त्याने केला.

जीवे मारण्याची दिली धमकी

याचवेळी त्या व्यक्तीने व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलही माहिती असल्याचं सांगितलं. "स्वतःची काळजी घ्या," असा इशारा देत त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २ कोटी रुपये तयार ठेवण्यास सांगितले आणि पुढील सूचना लवकरच दिल्या जातील, असंही बजावलं.

या धमकीनंतर व्यापाऱ्याने तातडीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

खंडणी मागण्याची तिसरी घटना

गेल्या आठवड्यात पुण्यात बिश्नोई गँगच्या नावाने खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २२ जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मांतरवाडी इथल्या त्यांच्या कारखान्यावर गोळीबार झाल्याची घटनाही घडली होती.

त्यानंतर २३ जून रोजी वडकीमधील एका औषध घाऊक विक्रेत्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. आता पुन्हा उत्तम नगरमधील व्यापाऱ्याला धमकी मिळाल्याने शहरातील व्यापारी वर्गात चिंता वाढली असून, या सलग घटनांमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT