Sonam and Raja Honeymoon Case Saam Tv News
क्राईम

Raja Raghuvanshi Case : सोनमने धुर्तपणे प्लॅन केला, बॉयफ्रेंडला इंदूरमध्ये थांबवलं अन् मारेकऱ्यांना...पोलीस चौकशीत मोठा खुलासा

Sonam and Raja Honeymoon Case : सोनम आणि राजा यांचा विवाह जानेवारी २०२५ मध्ये झाला होता. रघुवंशी समाजाच्या मॅट्रिमोनियल अॅपद्वारे दोघांची भेट झाली होती. या अॅपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा चर्चा झाली आणि ११ मे रोजी त्यांचा विवाह झाला.

Prashant Patil

इंदूर : इंदूरचा नवविवाहित तरूण राजा रघुवंशी याच्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शिलाँग पोलिसांच्या मते, राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी मिळून या हत्येचा कट रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने अत्यंत चतुराईने आपल्या पतीला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. तिने राज कुशवाहला मारेकऱ्यांना शिलाँगला पाठवण्याची जबाबदारी सोपवली, पण त्याला स्वतःला इंदुरमध्येच राहण्यास सांगितलं. कुणाला संशय येऊ नये आणि पोलिसांच्या हाती सापडण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

राज कुशवाह शिलाँगला गेला असता, त्यामुळे कट लवकर उघडकीस आला असता. त्यामुळे सोनमने राजला इंदुरमध्येच ठेवून मारेकरी आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांना शिलाँगला पाठवायला सांगितलं. गाजीपूर ते पाटणा या दरम्यान सोनमला ट्रान्झिट रिमांडवर नेताना शिलाँग पोलिसांनी तिची चौकशी केली. यामध्ये तिने किती धुर्तपणे हा कट रचला हे समोर आलं.

सोनम आणि राजा यांचा विवाह जानेवारी २०२५ मध्ये झाला होता. रघुवंशी समाजाच्या मॅट्रिमोनियल अॅपद्वारे दोघांची भेट झाली होती. या अॅपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा चर्चा झाली आणि ११ मे रोजी त्यांचा विवाह झाला. लग्नाच्या अवघ्या नऊ दिवसांनंतर, २० मे रोजी दोघे हनिमूनसाठी शिलाँगला गेले. २३ मे रोजी नोंग्रियाट गावातील शिपारा होमस्टेमधून चेकआउट केल्यानंतर राजाची हत्या करून त्याचा मृतदेह वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील खड्ड्यात फेकण्यात आला. २ जून रोजी मृतदेह सापडला आणि ९ जून रोज स्करून पोलिसांनी तिच्याशी चौकशी केली. त्यावेळी सगळा कट उघड झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT