
इंदूर : इंदूरमधील एक नवविवाहित तरुण Raja Raghuwanshi Murder हत्येप्रकरणानंतर पत्नी सोनम बेपत्ता झाली. या प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे पत्नी सोनमचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची मोठी माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोनमसह इतर ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोनमचे बाहेर प्रेमसंबंध असल्यानं हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोनम पोलिसांच्या तावडीत कशी सापडली? ते समोर आलं आहे.
काल ७ जूनला रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास सोनम गाजीपूरच्या नंदगंज भागातील एका हॉटेलवर पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे. तिथून तिने एका हॉटेल मालकाच्या फोनद्वारे आपला भाऊ गोविंदला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करत स्वत: गाजीपूर येथे असल्याचं सांगितलं. या घटनेदरम्यान, गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, हॉटेल मालकाने ११२वर फोनद्वारे संपर्क साधत पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि नंतर वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
अशातच आता पोलीस तपासातून नवी माहिती समोर आली आहे की, सोनमचं लग्नापूर्वीच राज कुशवाह नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे तिने तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला आणि कटाप्रमाणे निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेघालय पोलिसांनी एसआयटी स्थापन केली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींना इंदूर आणि एकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.