मध्य प्रदेशच्या इंदूरमधून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात पोलीस निरीक्षकाची २३ वर्षापूर्वींची चोरी समोर आली आहे. पोलिसाच्या नोकरीसाठी बोगस जातप्रमाणपत्र जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीचं नाव सत्यनारायण वैष्णव असून ४ ऑगस्ट १९८३ साली पोलिसाची नोकरी मिळवली. सत्यनारायणने पोलीस विभागात कोरी समाजाचं बोगस जातप्रमाणपत्र जमा केलं होतं. सत्यनारायणने २३ वर्ष पोलिसाची नोकरी केली. सत्यनारायणने बोगस जातप्रमाणपत्र जमा करून २३ वर्ष नोकरी केल्याने त्याच्यावर ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदूरचे प्रशासकीय अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं की, बोगस प्रमाणपत्र प्रकरण समोर आल्यानंतर सत्यनारायण वैष्णव यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. सत्यनारायणवर ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण पोलीस कोर्टात सुरु आहे. कोर्टाने ४ हजार रुपयांच्या दंडासहित ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्य प्रदेशात १६ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून पुलावरून फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या पालकांना बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
आरोपींनी कोचिंग क्लासला जाताना बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेलं. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. तसेच पुलावरून खाली फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी फरार आहेत.
पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. एका स्थानिक नागरिकाने कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर तिला जवळील रुग्णालयात दाखल केलं. पीडित मुलगी पूलावरून खाली फेकली गेल्यानंतरही बचावली गेली आहे. तिच्या बरगड्या आणि पायांमध्ये फ्रॅक्चर झालंय. तसेच इतर अनेक गंभीर दुखापती झाल्या आहेत. पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.