Indian-origin assistant teacher arrested in North Carolina for attacking her husband with a knife after a heated domestic argument. saam tv
क्राईम

Crime News: घरात झाडू नाही मारला म्हणून मास्तरीणबाईची सटकली; नवऱ्याच्या मानेवर चाकूचा वार

Indian-Origin Woman Tries Attack On Husband : उत्तर कॅरोलिनामध्ये काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या महिलेनं आपल्या पतीवर चाकू हल्ला केलाय. घरगुती वादात तिने पतीवर चाकू हल्ला केलाय.

Bharat Jadhav

  • भारतीय वंशाच्या शिक्षिकेने पतीवर चाकू हल्ला केला.

  • घरात झाडू न मारल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

  • आरोपी चंद्रप्रभा सिंग (वय ४४) यांना पोलिसांनी अटक केलीय.

घरातील साफसफाई करण्याच्या वादातून पतीवर पत्नीने चाकू हल्ला केलाय. चाकू हल्ला करण्याच्या आरोपाखाली उत्तर कॅरोलिनातील सहाय्यक शिक्षिकेला अटक करण्यात आलीय. या शिक्षिका भारतीय वंशाच्या असून त्या प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आहेत. WBTV ने दिलेल्या अटक वॉरंटनुसार, अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव चंद्रप्रभा सिंग ( ४४ वय वर्ष) असे आहे. या महिलेवर रविवार १२ ऑक्टोबर रोजी "बेकायदेशीरपणे, जाणूनबुजून, गंभीरपणे" दुसऱ्या व्यक्तीची मान कापल्याचा आरोप आहे.

काय म्हणाले तपास अधिकारी

पोलिसांनी सांगितले की, ही घटना उत्तर कॅरोलिनातील शार्लोटमधील बॅलेंटाइन परिसरातील फॉक्सहेवन ड्राइव्हवरील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घडलीय. एंडहेवन प्राथमिक शाळेत के-३ च्या वर्गासाठी शिक्षक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या चंद्रप्रभा सिंग हिने नवऱ्यावर प्राणघातक हल्ला केला.

शार्लोट-मेक्लेनबर्ग पोलीस विभागाने (सीएमपीडी) या वृत्ताल पुष्टी केली आहे. या चाकू हल्ल्याची घटना शाळेच्या मालमत्तेत झाली नाहीये. त्यात कोणताही विद्यार्थी किंवा कर्मचारी सामील नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. चाकू हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव हे अरविंद सिंग आहे.

कोण खरं बोलतंय?

पीडित व्यक्तीनं नोंदवलेल्या जबाबानुसार, त्याची पत्नी चंद्रप्रभा सिंग ही घर स्वच्छ न केल्यामुळे निराश नाराजी झाली होती. घर स्वच्छ नसल्याने तिला राग आला त्यानंतर तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला." तर आरोपी पत्नीने पोलिसांकडे वेगळाच जबाब नोंदवलाय. चंद्रप्रभा सिंग यांनी घटनेची वेगळीच माहिती दिली. तिने पोलिसांना सांगितले की, ती नाश्ता बनवत होती, तेव्हाच नवऱ्यानं तिला मदतीसाठी विचारणा केली.

त्यात घर अस्वच्छ असल्यानं मी नाराज होते, ज्यावेळी नवऱ्यानं मदतीसाठी हाक मारली तेव्हा माझ्या हातात चाकू होता, तो चुकीने नवऱ्याच्या मानेला लागला. दरम्यान घटनेच्या दिवशी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:४९ वाजेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अरविंद सिंगच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. आरोपी शिक्षिकेला अटक केल्यानंतर आधी एका दंडाधिकाऱ्याने तिचा जामीन नाकारला होता परंतु नंतर १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

Kothimbir Vadi Tips: कोथिंबीर वडी नरम होते, आतून कच्ची राहतेय? मग वापरा ही एक ट्रिक, खमंग कुरकरीत होतील वड्या

Pune Tourism : हिरवेगार डोंगर अन् पांढरे शुभ्र धबधबे; पुण्याजवळील निसर्गरम्य ठिकाण, हिवाळी ट्रिपसाठी बेस्ट

Bigg Boss 19 : हीच सून हवी! "तू २६ चा, ती २१ ची"; कुनिकानं ठरवलं मुलाचं लग्न,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT