फावड्यानं चिमुकलीचा जीव घेणाऱ्या आरोपीला पोलिसांची सूट; मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग मग..

8-Year-Old Girl Attacked in Malad: मालाडमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर आरोपीने फावड्याने हल्ला केला. सुरूवातीला आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. मनसेच्या दणक्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
8-Year-Old Girl Attacked in Malad
8-Year-Old Girl Attacked in MaladSaam Tv
Published On

मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ८ वर्षांच्या चिमुकलीवर फावड्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. मात्र, नंतर त्यांनी आरोपीला नोटीस देऊन सोडून दिले. दरम्यान, मनसेच्या दणक्यानंतर मुलीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात ८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला कऱण्यात आला. आरोपी मुलीवर फावड्याने हल्ला केल्यानंतर फरार झाला. अजय यादव (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या. सुरूवातीला पोलिसांनी आरोपीला नोटीस देऊन सोडून दिले.

8-Year-Old Girl Attacked in Malad
'लग्नाच्या १० महिन्यांत १० दिवसही खूश नाही, मी आयुष्य..' VIDEO तयार करून विवाहितेनं आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल

मात्र, या निष्काळजीपणाविरोधात मनसे आक्रमक झाली. विभाग प्रमुख दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले. मनसेनं पोलिसांना आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. नंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतलं.

8-Year-Old Girl Attacked in Malad
दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

दिनेश साळवी यांनी सांगितले की, “८ वर्षांच्या मुलीवर फावड्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला आधी केवळ नोटीस देऊन सोडण्यात आले होते. पण आता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम ११८ भाग २ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” या घटनेनंतर मालाड परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com