Son in Law and Mother in law Love Affair Saam TV
क्राईम

Shocking News: काय सांगता? बायकोला सोडून चक्क सासूच्याच प्रेमात पडला जावई; रात्री भेटायला गेला अन् भलतंच घडलं

Son in Law and Mother in law Love Affair: पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं.

Satish Daud

Son in Law and Mother in law Love Affair

प्रेम हे आंधळं असतं म्हटलं जातं. कोण कधी कुणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. काहीजण प्रेमात अक्षरश: वेडे होतात आणि नात्याचंही भान ठेवत नाही, याचाच प्रत्यय एका घटनेतून आला आहे. तीन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाचं आपल्याच सासूवर प्रेम जडलं. खरं तर सासू देखील त्याच्या प्रेमात पडली होती.

दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला होता, की त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं. अशातच पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मग काय सासरकडील मंडळींसह गावकऱ्यांनी या तरुणाची चांगलीच धुलाई केली. त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडला आहे.

सासूसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून जावयाची धुलाई करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील यादव असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते.

काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन अपत्ये देखील झाली. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले. त्याचा सासरा आणि मेहुणा बाहेरगावी कामाला असल्याने सुनील आपल्या पत्नीला अंधारात ठेऊन नेहमी सासूला भेटण्यासाठी जात होता.

रविवारी सुनीलचे पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर तो सासूला भेटण्यासाठी कल्ला गावात पोहचला. तिथे दोघेही भेटत असताना अचानक सुनीलचा सासरा आणि मेहुणा घरी आला. त्यांनी सुनीलला सासूसोबत नको त्या अवस्थेत बघितले. यावरून दोघांनाही राग अनावर झाला त्यांनी गावातील लोकांना बोलावून सुनीलची चांगलीच धुलाई केली.

गावातील लोकांनी सुनीलला एका झाडाला बांधून ठेवले. याची माहिती त्याच्या पत्नीला देखील देण्यात आली. आईसोबत नवऱ्याचे प्रेमसंबध असल्याचं कळताच सुनीलच्या पत्नीलाही राग अनावर झाला. तिने देखील त्याला चप्पलेने मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT