क्राईम

Digital Arrest : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी डिजिटल अरेस्टचा बळी, 7 लाख रुपयांची फसवणूक

Digital Arrest : आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : (Digital Arest IIT Mumbai Student) आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्याला फसवण्यासाठी भामट्यांनी दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) नावाखाली बनावट व्हॉट्सअॅप कॉल करून त्याच्यावर आरोप लावले आणि मोठी रक्कम उकळली. या प्रकारामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

अशी झाली फसवणूक

विद्यार्थ्याला एका अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला TRAI चा अधिकृत अधिकारी असल्याचे भासवले. या व्यक्तीने विद्यार्थ्याला सांगितले की, त्याच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले आहे. हा वॉरंट त्याच्या मोबाईल नंबरशी संबंधित असल्याचे सांगून त्याला मोठ्या कायदेशीर अडचणीत पडण्याची भीती दाखवण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी विद्यार्थ्याला सांगितले की, हा वॉरंट रद्द करण्यासाठी लगेच रक्कम भरली पाहिजे, अन्यथा त्याला तुरुंगवास होईल. विद्यार्थ्याला खोट्या कायदेशीर गोष्टींच्या जाळ्यात अडकवून घाबरवले गेले. त्यासाठी त्यांनी अत्यंत हुशारीने अधिकृत भाषा आणि गंभीर स्वर वापरून त्याच्यावर दबाव आणला.

वैयक्तीक खात्यांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले

भामट्यांनी विद्यार्थ्याला विविध खात्यांमध्ये 7 लाख रुपयांचे व्यवहार करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या विद्यार्थ्याने त्यांच्या सूचनांनुसार पैसे ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्याने सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांविरोधात सावधगिरी राखणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीपासून बचावाचे उपाय

-अनोळखी कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नका.

-सरकारी संस्था किंवा अधिकारी वैयक्तिक खात्यावर पैसे मागत नाहीत.

-संशयास्पद कॉल्सवर लगेचच संबंधित संस्थांशी थेट संपर्क साधा.

-तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT