Police personnel at the crime scene in Bhagalpur, Bihar, after a shocking acid attack and suicide case. Saam Tv
क्राईम

नवऱ्याने बायकोवर अ‍ॅसिड फेकलं, जबरदस्तीने पाजलं, स्वतःनेही...; समोरचं दृश्य बघून पोलिसही हादरले

Husband Throws Acid On Wife In Bihar: नवऱ्याने बायकोच्या अंगावर अॅसिड फेकले आणि तिला जबरदस्तीने ही पाजले. इतक्यावरच थांबला नाहीतर अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली.

Omkar Sonawane

नवऱ्याने बायकोच्या अंगावर अॅसिड फेकले आणि तिला जबरदस्तीने ही पाजले. इतक्यावरच थांबला नाहीतर अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. घरघुती या हिंसाचाऱ्याच्या घटनेने बिहार हादरले आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचारातून नवऱ्याने त्याच्या बायकोवर अॅसिड फेकले आणि तिला जबरदस्ती पेऊ घातले आणि त्यानंतर स्वतः देखील पिले.

यानंतर नवऱ्याचा तडफडत तडफडत जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या बायकोची सध्या प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. प्राथमिक तपासात या दांपत्याच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या वडिलांनी आईला मारण्यासाठी दिल्लीहून बॅगेत अॅसिड आणले होते.

ही भयावह घटना गुरुवारी (दि.1) म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडल्याने मोठी खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव दुलाल पोद्दार (वय 55) असे आहे. त्याची पत्नी पूनम देवीवर सध्या उपचार सुरू असून तिची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुलाल हे दिल्लीत काम करत होते आणि 31 डिसेंबर रोजी घरी परतले होते. त्यांची बायको पुनम ही रानीतालाबमध्ये शाळा चालवते.

अ‍ॅसिड पिऊन पतीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीहून परतल्यानंतर त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. यावेळी दुलाल पोद्दारने आपल्या बायकोवर अॅसिड हल्ला केला आणि तिला जबरदस्ती पिऊ घातले. त्यानंतर या नराधम नवऱ्याने स्वतःही अॅसिड प्राशन करत स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले.

यावेळी पत्नी पुनम देवी गंभीररित्या भाजली होती तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोलीत बंद असलेल्या तिच्या पतीचा तडफडत मृत्यू झाला. ही घटना डोळ्या देखत झाल्याने मुलगा आयुषमध्ये प्रचंड घबराहाट पसरली. तो म्हणाला की जर माझे वडील आईसोबत असे करू शकता तर ते त्याच्याशी आणि शाळेतील इतर मुलांसोबत ही काही करतील. या भीतीपोटी त्याने शाळेतील सुमारे 50 मुलांना त्याच्या आजोबांच्या घरी घेऊन गेला.

शुक्रवारी सकाळी तो त्याच्या वडिलांची विचारपूस करण्यासाठी रानीतालब येथे पोहोचला तेव्हा घरमालकाने दरवाजा उघडण्यास नकार दिला, तो म्हणाला की तो पोलीस आणि स्थानिक प्रतिनिधी येईपर्यंत दरवाजा उघडणार नाही. पोलिस आणि स्थानिक लोक आले तेव्हा संध्याकाळ झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा त्याचे वडील दुलाल पोद्दार यांचा मृतदेह तिथे पडलेला आढळला.

दुलाल आणि पूनम देवी यांचा मुलगा आयुष म्हणाला की त्याचे वडील दिल्लीत राहत होते आणि काम करत होते, तर त्याची आई राणीतालमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवते. तो म्हणाला की त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन होते, म्हणूनच त्यांचे आईशी पटत नव्हते.ते बराच काळ दिल्लीत वास्तव्यास होते. यावेळी त्याच्या वडिलांनी फोन करून सांगितले की मी आता सुधारलो आहे केली आहे आणि आता दारू पिणार नाही. नवीन वर्ष सर्व कुटुंबासोबत घालवेल. कुटुंबाने त्याच्यावर विश्वास ठेवला.

वडिलांनी दिल्लीमध्येच आईला मारण्यासाठी कट रचला

आयुषने सांगितले की, ३१ डिसेंबर रोजी मी स्वतः त्याच्या वडिलांना घेण्यासाठी स्टेशनवर गेलो होतो. मी वडिलांच्या बॅगेत काय हे पाहण्यासाठी गेलो तर मला बॅगेला हात लावून दिला नाही. आयुष म्हणतो की त्याचे वडील त्याच्या आईला मारण्याचा प्लान करून आले होते. अशी खळबळजनक माहिती त्यांच्या मुलाने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT