

seven explosions in Caracas Venezuela news : २०२६ नव्या वर्षाची सुरूवात युद्धाने होणार की काय? अशी परिस्थिती उद्भवली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकस स्फोटानी हादरली आहे. लोक गाढ झोपेत असतानाच एकापाठोपाठ एक सात स्फोट झाली. त्यानंतर काराकस शहरावरून उडणाऱ्या विमानांचा आवाज ऐकू आला. या हल्ल्यानंतर राजधानीमध्ये खळबळ उडाली अन् नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हा हल्ला अमेरिकेने केल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हेनेझुएला आणि अमेरिकेचा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. आरोप प्रत्यारोपावरून आता हल्ल्या प्रर्यंत प्रकरण पोहचल्याचे चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये शनिवारी पहाटे एकापाठोपाठ एक सात स्फोट झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री २ वाजता पहिला स्फोट झाला. एकापाठोपाठ एक ७ स्फोट वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यानंतर शहरावरून उडणाऱ्या विमानांचा तीव्र आवाज लोकांना ऐकू आला. रॉयटर्स आणि स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्यानंतर शहराच्या दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. स्फोटानंतर राजधानीच्या वेगवेगळ्या भागांतील लोक घाबरून रस्त्यावर उतरले. स्फोटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनेक स्फोट झाल्याचे दिसतेय.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकसवर अमेरिकेने हल्ला केल्याचे बोलले जातेय. याबाबत अद्याप कोणताही सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हेनेझुएला सरकारकडूनही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील संबंध चिघळले आहेत. त्यात १ जानेवारी रोजी व्हेनेझुएला सरकारने अमेरिकेच्या ५ नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्याचदिवशी अमेरिकेकडून व्हेनेझुएलावर मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा हल्ला अमेरिकेने केला का? अशी चर्चा सुरू आहे.
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील राजकीय तणाव शिगेला पोहोचला असतानाच ही घटना घडली आहे. या स्फोटात आतापर्यंत मृताचा कोणताही आकडा समोर आलेला नाही. सीएनएनच्या वृत्तानुसार मध्यरात्री झालेला एक स्फोट इतका शक्तिशाली होता की काही घरांच्या खिडक्या हादरल्या. या स्फोटांमुळे राजधानीच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. शहरावरून रात्री आकाशात धुराचे मोठे लोळ उठत असल्याचे व्हिडिओ दिसतेय. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये शहरातील स्फोटांचे फोटो दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.