Shocking : अंघोळ करताना श्वास कोंडला, बड्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Punjab Jalandhar Shivsena Leader Daughter Death : पंजाबमधील जालंधर येथे बाथरूममध्ये बसवलेल्या गिझरमधून गॅस गळती झाल्याने २२ वर्षीय तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Shocking : अंघोळ करताना श्वास कोंडला, बड्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?
Punjab Jalandhar Shivsena Leader Daughter Deathsaam tv
Published On
Summary
  • गिझर गॅस गळतीने २२ वर्षीय तरुणीचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू

  • कुटुंबीयांनी दरवाजा तोडून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले

  • मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

  • पोलिसांचा तपास सुरू

गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे बाथरुममध्ये आंघोळ करताना तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव मुनमुन चितवन (२२ वर्षे) असे आहे. सदर घटना पंजाबमधील जालंधर येथे घडली आहे. मृत तरुणी ही पंजाबमधील शिवसेना नेते दीपक कंबोज यांची मुलगी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुनमुनचा १ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. यासाठी तिच्या कुटुंबीयांनी ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची आणि मुनमुनच्या वाढदिवसाची तयारी करत होते. मुनमुन देखील तिच्या वाढदिवसाची तयारी करत होती. यादरम्यान ती बाथरुममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली, परंतु काळाने काहीतरी वेगळचं ठरवलं होतं.

Shocking : अंघोळ करताना श्वास कोंडला, बड्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?
Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, बाथरूममध्ये बसवलेल्या गिझरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे बाथरुममध्ये गॅस सर्वत्र पसरला आणि मुनमुनला श्वास घेण्यास त्रास झाला आणि ती आत बेशुद्ध पडली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबाला संशय आला. त्यांनी दार वाजवले, हाका मारल्या पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा मुनमुन बेशुद्ध अवस्थेत आढळली.

Shocking : अंघोळ करताना श्वास कोंडला, बड्या शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?
Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज

त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याआधीच मुनमुनचा मृत्यू झाला होता. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक वैद्यकीय अहवालात गॅसमुळे श्वास गुदमरल्याचे दिसून आले आहे. तथापि मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि गीझरमध्ये तांत्रिक बिघाड होता की अपुरा गॅस व्हेंटिलेशन होता याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com