Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. IMD ने राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे.
Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात ढगाळ वातावरण असले तरी गारठा कायम आहे

  • गेल्या दोन दिवसांत मुंबईसह अनेक भागात हलका पाऊस झाला

  • निफाड येथे 4.5°C नीचांकी तापमानाची नोंद

  • IMD कडून थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जाहीर

राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातवरण पाहायला मिळालं तरीही गारठा कायम होता. तसेच मुंबईसह अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बरसला. आज वातावरणात गारठा असून तापमानात चढ -उतार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डिसेंबरमध्ये राज्यात थंडीचा कडाका अधिक असल्याने निफाड येथे २० डिसेंबर २०२५ रोजी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी ४.५ तापमान नोंदले गेले होते. दरम्यान हवामान खात्याने काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.

काल राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. या ढगाळ वातावरणाचा परिणाम थंडीवर झाला. आज नाशिक, निफाड, मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमानात चढ उतार कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली उतरला आहे.

Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज
Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

तापमानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे थंडीचा परिणाम शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांवर झाला आहे. २०२५ हे वर्ष १९०१ पासूनचे आठवे उष्ण वर्ष ठरले असले तरी, या वर्षातील शेवटचे तीन महिने तुलनेने थंड असल्याचे दिसून आले आहे. यातही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत थंडी अधिकच वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईसह अनेक भागांत शेकोट्या पेटल्या, वाचा आजचा हवामान अंदाज
Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

वर्षभरात चार चक्रीवादळांची निर्मिती

२०२५ या वर्षात शक्ती, मोंथा, सेन्यार आणि डिटवाह ही चार चक्रीवादळे तयार झाली. यातील दोन चक्रीवादळे तीव्र झाली. या सर्व प्रणाली मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) विकसित झाल्या. चारपैकी मोंथा, सेन्यार आणि डिटवाह ही तीन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात, तर शक्ती हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले. वर्षभरात उत्तर हिंदी महासागरात एकूण ११ तीव्र कमी दाब (डिप्रेशन) प्रणाली तयार झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com