Dharashiv Crime News 
क्राईम

Dharashiv News: नवऱ्यानं दुसरं लग्न केलं, बायकोचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांवर नको ते आरोप, म्हणाली...

Dharashiv Crime News: पतीने दुसरे लग्न केले म्हणून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून स्वत: पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचं कारण होतं नवऱ्याचं दुसरं लग्न. पहिल्या पत्नीला सोडून एका व्यक्तीनं दुसरीसोबत संसार मांडला, त्यानंतर पहिल्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नवऱ्यानं दुसऱ्या महिलेसोबत संसार मांडल्याचा राग मनात धरत पहिल्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या या घटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेनं पोलिसांवरही गंभीर आरोप केलेत.

काय आहे प्रकार

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी सारखी वर्दळ होती. दुपारी एक महिला आली. महिलेने आपल्या पतीविरोधात आरोप त्याची तक्रार करण्यास सुरुवात केली. पोलीस तिची तक्रार नोंदवून घेत नसल्यानं तिनं पोलिसांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची तक्रार दिली. परंतु आपली तक्रार नोंदवण्यास कोणी तयार नसल्यानं तिनं आव बघितला ना ताव थेट अंगावर पेट्रोल टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा हा प्रकार पाहून येथील कर्मचारी धास्तावले. महिला पुढे काही अनुचित प्रकार करेल तोच महिला पोलिसांनी प्रसंगावधान साधत महिलेला पकडलं. महिलेच्या हातातून पेट्रोल आणि आगपेटी हिसकावून घेतली.

महिलेची तक्रार काय

पोलीस पैसे घेऊन आपल्या पतीला मदत करत असल्याचा आरोप आत्मदहन करणाऱ्या महिलेने केलाय. अपहरणाची केस करू असे धमकावल्याचा आरोप महिलेने पोलिसांवर केला. आत्मदहन करणारी महिला धाराशिवच्या वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या धनेश्वरी बोरगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान महिलेच्या हातातील ज्वलनशील पदार्थ हिसकावण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि महिलेत झटापट झाली. भर पावसात महिला आणि कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर बदलले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra politics : राष्ट्रवादीत 'भूकंप'; पटेल-तटकऱ्यांची पदे कापली? पार्थ आणि जय पवारांची एन्ट्री, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT