Dhirendra Pratap Singh murder case latest update in Lucknow saam tv
क्राईम

धक्कादायक हत्याकांड; हिंदुत्ववादी नेत्यावर गोळीबार, कालव्यात सापडला मृतदेह

Lucknow Crime Hindu Leader Killed: हिंदुत्ववादी नेते धीरेंद्र प्रताप सिंह यांचा मृतदेह दुबग्गा परिसरातील कालव्यात आढळला. प्राथमिक माहितीनुसार गोळीबारातून हत्या झाल्याचा संशय असून, जमिनीच्या वादाच्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणातील ताज्या घडामोडी

  • लखनौमध्ये हिंदुत्ववादी नेत्याचा मृतदेह कालव्यात सापडला

  • फॉर्च्युनर एसयूव्हीमध्ये धीरेंद्र प्रताप सिंह यांच्यावर गोळीबार

हिंदुत्ववादी नेते धीरेंद्र प्रताप सिंह यांची गोळ्या झाडून हत्या झालीय. विशेष म्हणजे लखनौमधील दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हत्याची घटना घडलीय. धीरेंद्र प्रताप सिंह हे आपल्या 'फॉर्च्युनर' एसयूव्हीमधून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. धीरेंद्र प्रताप सिंह हे मूळचे उन्नावचे रहिवासी होते. सिंह हे पीजीआय (PGI) परिसरात राहत होते. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

हिंदू नेते धीरेंद्र प्रताप सिंह यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शनिवारी बेपत्ता झालेल्या धीरेंद्र प्रताप सिंह यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत होती. आता त्यांचा मृतदेह दुबग्गा भागातील एका कालव्यात सापडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असावी, मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि हत्येमागची संपूर्ण परिस्थिती पोलीस तपास व शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मृत धीरेंद्र प्रताप सिंह हे हिंदू युवा वाहिनी'चे विभागीय प्रभारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांना सरकारी सुरक्षाही पुरवण्यात आली होती. शनिवारी ते अचानक बेपत्ता झाल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला, परंतु अनेक तासांच्या शोधकार्यानंतर दुबग्गा भागातील एका कालव्यात त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. कालवा आणि परिसरातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले जात आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, एसटीएफचे (STF) पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तपासात सहभागी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, CJPचे प्रमुख नेते ताब्यात, अंजिक्य शिंदेंकडे नेतृत्व

Bathroom Mirror Benefits: बाथरूममध्ये आरसा असण्याचे फायदे काय? जाणून घ्या

10K Steps vs Cardio: १० हजार स्टेप्स चालणे की ३० मिनिटे कार्डिओ? वजन कमी करण्यासाठी कोणती उपाय आहे बेस्ट?

काँग्रेस सोमावारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; केंद्र सरकार बरखास्त करण्याची गरज-राहुल गांधी

जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT