high court orders report on complaint about awdhutwadi police station building  Saam Digital
क्राईम

यवतमाळ: अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या कामाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, 3 आठवड्यात अहवालाचे निर्देश

high court orders report on complaint about awdhutwadi police station building : तत्कालीन पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची नावे पोलिस महासंचालकांना 3 आठवड्यात माहिती सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या कामाची गंभीर दखल घेत 3 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दिगंबर पचगाडे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे बांधकाम प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी नुकतीच झाली.

अवधूतवाडी पोलिसांनी अवैध मार्ग अवलंबून गुन्हेगारांकडून पैसा गोळा करित त्या पैशातून पोलिस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बांधकामासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेण्यात आली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकाशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अवधूतवाडी पोलिस ठाणे बांधकाम प्रकरणात उच्च न्यायालयात 2022 पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर नुकतेच न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाला. गृह विभागाने अतिरिक्त मुख्य सचिवांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे आणि त्याचे यासंदर्भात काय म्हणणे आहे हे तीन आठवड्यात सांगावे असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT