Man Killed girlfriend in manali  Saam tv
क्राईम

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Man Killed girlfriend in Manali : दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण या प्रेमाचा आता भयंकर शेवट झालाय. विनोदनं शीतलला निर्घृणपणे संपवलं.

Vishal Gangurde

मनाली : २३ वर्षांचा विनोद, २६ वर्षांची शीतल. विनोद हरयाणाचा राहणारा. तर शीतल मध्य प्रदेशची रहिवासी. दोन राज्ये, तिथली भाषा आणि संस्कृती वेगवेगळी. पण प्रेमाला ना राज्याच्या सीमा आडव्या आल्या, न भाषा. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण या प्रेमाचा आता भयंकर शेवट झालाय. विनोदनं शीतलला निर्घृणपणे संपवलं. लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडेल अशी या लव्ह स्टोरीची दुसरी काळी बाजू या घटनेनं समोर आलीय.

शीतलच्या हत्येप्रकरणी विनोदला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि शीतल हे दोघे मनालीला फिरायला गेले होते. तिथे एका हॉटेलमध्ये थांबले. त्या हॉटेलच्या खोलीतच त्याने शीतलचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर तिचा मृतदेह एका बॅगेत कोंबला. त्यानंतर तिथून निघून गेला. काही तासांतच त्याला बजौराजवळ कुल्लू-मंडी सीमेवर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

विनोद हा हरयाणातील पलवल येथील रहिवासी आहे. तर शीतल ही मूळची भोपाळची राहणारी होती. मनाली पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १३ मे रोजी दोघेही मनालीला आले होते.

मनालीच्या एका हॉटेलमध्ये दोघेही थांबले होते. १५ मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विनोद हॉटेलच्या रिसेप्शनजवळ आला. टॅक्सीसाठी फोन केल्यानंतर त्याने चेक आऊट केले. तो बाहेर पडला त्याच्यासोबत शीतल नव्हती. तसेच तो एक भली मोठी बॅग घेऊन जात होता.

ती जड बॅग त्यानं टॅक्सीत ठेवली. त्या कर्मचाऱ्याला काहीतरी विचित्र घडलं असल्याचा संशय आला. त्यानं तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत विनोद फरार झाला होता. पोलिसांनी ती बॅग उघडून बघितली. त्यात महिलेचा मृतदेह असल्याचे दिसले. मृतदेह बॅगमध्ये भरून ती बॅग तिथल्या निर्जनस्थळी फेकून देण्याच्या विचारात आरोपी होता. पण हॉटेल कर्मचाऱ्यामुळं त्याचा हा कट फसला.

विनोदनं तिच्या हत्येचा कट आधीच रचला होता किंवा या दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झालं असावं आणि त्यानंतर त्याने तिचा खून केला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. आरोपीच्या चौकशीनंतरच त्यांच्यात नेमकं काय घडलं आणि कोणत्या कारणावरून त्यानं हत्या केली याची माहिती समोर येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

मनालीचे पोलीस अधिकारी केडी शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेबद्दल आम्हाला खूपच त्रोटक माहिती मिळाली आहे. ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिथे विनोदनं आधार कार्ड किंवा फोन नंबर वैगेरे काहीही दिलं नव्हतं. याशिवाय तिथले सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यान्वित नव्हते. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या घरी या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT