Model Sheetal Case Saam Tv
क्राईम

Model Sheetal Case: मॉडेल शीतलच्या मारेकऱ्याला अटक, बॉयफ्रेंडनेच गळा चिरून संपवलं; हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

Haryana Model Killed Case: हरियाणाची मॉडेल शीतल चौधरीचा मृतदेह कारमध्ये सापडला होता. गळा चिरून तिची हत्या करण्यात आल होती आणि कारमध्ये मृतदेह ठेवून ती कालव्यात फेकून देण्यात आली होती.

Priya More

हरियाणाची मॉडेल शीतल उर्फ ​​सिम्मी चौधरी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शीतलच्या हत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सुनीलला पोलिसांनी अटक केली आहे. सुनीलनेच शीतलची हत्या केली आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने कार कालव्यामध्ये फेकून दिली जेणेकरून पोलिसांना ही हत्या नसून अपघात आहे असे वाटेल. गळा चिरून शीतलची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह दिल्ली समांतर कालव्यात फेकून देण्यात आला होता. हत्येच्या ३० तासांनंतर पोलिसांना तिचा मृतदेह सोनीपतच्या खांडा गावात एनसीआर वॉटर चॅनेलमध्ये सापडला. शीतलच्या मानेवर आणि हातावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल (२४ वर्षे) ही हरियाणवी संगीत उद्योगात काम करत होती. ती तिची बहीण नेहासोबत पानिपतमध्ये राहत होती. १४ जून रोजी शूटिंगसाठी गेलेली शीतल परत घरी आली नाही. त्यानंतर नेहाने पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. रविवारी रात्री खांडाच्या ग्रामस्थांनी एका महिलेचा मृतदेह कालव्यामध्ये पाहला आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह शीतलचा असल्याचे समोर आले.

शीतची हत्या तिचा बॉयफ्रेंड सुनीलने केली. गळा चिरून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. तिची मान चाकूने कापलेल्या खुणा आढळून आल्या होत्या. शीतल शनिवारी शूटिंग करण्यासाठी पानिपत अहार गावात गेली होती. ती परत न आल्यानंतर तिच्या बहिणीने पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे धागेदोरे शनिवारी दिल्ली समांतर कालव्यात सापडलेल्या कारशी जोडले गेले. प्रत्यक्षदर्शीने असे सांगितले होते की, आरोपी सुनीलने शीतलची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. नंतर हत्या अपघात म्हणून दाखवण्यासाठी त्याने कारही कालव्यात टाकली आणि स्वतः पोहत बाहेर पडला. पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली आहे.

शीतलने बहिणीला कॉल करून सुनील मारहाण करत असल्याचे सांगितले होते. नेहा म्हणाली की, शीतलने शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि सुनील तिला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. नंतर शीतलचा फोन बंद झाला. सुनीलने शीतलची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शीतल विवाहित होती आणि तिला एक लहान बाळ होते. पण ती काही महिन्यांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. शीतलला नुकताच कळाले होते की सुनील विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत. म्हणून तिने अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुनील नाराज होता. यावरून त्यांच्यात सतत भांडणं होत होती. अशातच त्याने तिची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT