Shirdi Crime : अल्पवयीन मुलांची सैतानी पार्टी, बर्थडेच्या पार्टीसाठी हत्या; मुलांच्या कृत्यानं साईंची शिर्डी हादरली

Shirdi Murder Birthday Party : एका हत्त्येच्या घटनेनं शिर्डी हादरलीये. ही हत्त्या 7 अल्पवयीन मुलांनी करुन क्रूरतेचा कळस गाठलाय. या हत्त्येचं कारण ऐकून तुम्ही हादरुन जाल. पाहूया एक रिपोर्ट.
Shirdi Murder Birthday Party
Shirdi Murder Birthday Party Saam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

अहिल्यानगर : लहानथोरांपासून सगळ्यांनाच हल्ली बर्थडे पार्टीचं आकर्षण असतं. पण याच बर्थडे पार्टीसाठी चक्क एका माणसाचा जीव गेलाय. होय, बर्थडे सेलिब्रेशनसाठी पैसे हवेत म्हणून एका व्यक्तिला धारधार चाकूनं भोसकून मारलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करणारे अल्पवयीन मुले आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या सात मुलांनी सपासपा वार करुन गणेश चत्तर यांचा जीव घेतलाय. गणेश चत्तर यांचे अपहरण आणि खून नेमका कसा करण्यात आला?

चिमुरड्यांची सैतानी पार्टी

चत्तर यांनी राहता हद्दीत दुचाकीवरील तरुणांना लिफ्ट मागितली

तरुणांनी निर्जन स्थळी नेत लुटलं

मारहाण करत चाकू भोसकून हत्या

चत्तर यांच्या खिशातील मोबाइल चोरला

बर्थडे पार्टीसाठी 4500 रुपयांना मोबाईल विकला

पैसे हवेत म्हणून खून केल्याची आरोपींची कबुली

Shirdi Murder Birthday Party
Pune Maval Indrayani Bridge Collapses : ८ कोटींचा पूल, ८० हजारच मंजूर? मावळमधील इंद्रायणी पूल कोसळला, राज ठाकरेंचा संताप

अल्पवयीन नशेखोर आरोपींनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्याने चत्तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला..गणेश चत्तर यांच्यामागे पत्ती आणि दोन मुले असा परीवार आहे. आमच्या माणसाची यात चुक काय? असाच सवाल कुटुंबियांनी उपस्थित केलाय. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी पोलिस प्रशासना समोर मोठं आव्हान आहे. तीन महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची पहाटे हत्या झाली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या या सैतानी कृत्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या अंमली पदार्थ सेवनाचा धोकाही पुन्हा अधोरेखित झालाय. या नशेखोर प्रवृत्तीला कसा आळा घातला जाणार? आणि साईनगरीतील गुन्हेगारी हद्दपार कधी होणार ? हा खरा सवाल आहे.

Shirdi Murder Birthday Party
Amravati News : कूलर उठतोय जीवावर, शॉक लागून आईसह दोन मुलांचा मृत्यू; अमरावतीत हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com