
अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. अचलपूरच्या चमक बुद्रुकमध्ये ही घटना घडलीय. कुलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. तुम्ही तुमच्या घरात कुलर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण थंडावा देणारा कुलर तुमच्या जिवावरही उठू शकतो. याचा प्रत्यय अमरावतीत समोर आलाय. अचलपूरच्या चमक बुद्रुक गावात कुलरच्या शॉकमुळे आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. सुमती कासदेकर कुलरमध्ये पाणी भरत असताना त्यांना अचानक शॉक लागला. या दुर्घटनेत दोन मुलांसह सुमती यांचा मृत्यू झालाय. नक्की काय घडलंय ते सुमतीचे पती लक्ष्मण कासदेकर यांनी सांगितलंय.
या कासदेकर कुटुंबाला सहा मुले होती. त्यापैकी चार मुले दुसऱ्या खोलीत असल्याने सुदैवाने बचावली आहेत. दरम्यान कुलरमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं यापूर्वीही अनेक जणांचा मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्यातील फेगडमध्येही ९ वर्षीय उत्कर्ष सेलोटे नावाच्या चिमुकल्याचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे कुलरचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यायला हवी?
कूलर वापरताना काय काळजी घ्यावी?
कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी विजेचा प्लग काढा
कूलरला ओल्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका
प्लग किंवा सॉकेटमध्ये स्पार्किंग होत असल्यास कूलर त्वरित दुरुस्त करा
सैल आणि कापलेली वायर कूलरला जोडण्यासाठी वापरू नये
या घटनेमुळे घरगुती विजेच्या उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विद्युत उपकरणांची वेळोवेळी तपासणी आणि देखभाल देखील महत्त्वाची आहे. हेच या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.