
सध्या आधार कार्डचा वापर आपल्या महत्वाच्या कामासाठी सर्रास केला जातो. एखादे लोन, एखाद्या ठिकाणी ओळख, शाळेत प्रवेश अशा सगळ्यासाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्ड आपण प्रवासातसोबतच ठेवत असतो. अशावेळेस तुम्हाला काही फसवे चुकीचे आणि बनावट आधार कार्ड देऊन तुमची फसवणूक करु शकतात. त्यात तुमची आधार कार्ड तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेले असेल तर त्याने तुमचे बॅंक खाते सुद्धा रिकामे होऊ शकते. पुढे आपण याचबाबती महत्वाची माहिती आणि टिप्स जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड सगळ्यात आधी वेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही https://uidai.gov.in/ या अधिकत वेबसाईला भेट द्या. पुढे My Aadhaar या गटावर क्लिक करा. Verify Aadhaar Number हा पर्याय निवडा. पुढे १२ अकांचा आधार नंबर स्कीनवर टाकून घ्या. मग कॅप्चा कोड टाकून घ्या. शेवटी वेरीफाय बटनावर क्लिक करा. मग आधार नंबर अॅक्टीव्हेट असेल तर तुमचे आधार कार्ड खरे आहे. जर नसेल तर ते अमान्य आहे.
तुम्ही आधार कार्ड पडताळणीची ही सुविधा पूर्णपणे मोफत मिळवू शकता. तुम्हाला यासाठी वेबसाइट किंवा mAadhaar App दोन्ही पद्धतींच्या मदतीने आधारची सत्यता तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला mAadhaar App मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घ्यावे लागेल.
आधार क्रमांक पडताळणी करा. यामध्ये तुम्हाला क्रमांक टाकावा लागेल. वेबसाइटप्रमाणे पडताळणी करावी लागेल. क्यु आर कोड तुमच्या आधार कार्डवर असेल. तो कोड स्कॅन करुन तुम्ही सत्यता तपासू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.