Hariyana Crime News Saam TV
क्राईम

Crime News: दारू पाजून विवाहित महिलेवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, भाजप नेत्यावर आरोप

Hariyana Crime News: हरियाणामध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी भाजपचा नेता आणि गायकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हरियाणात खळबळ उडाली आहे.

Priya More

हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथील हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेवर दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि एका गायकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 डी (सामूहिक बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2023 मध्ये घडली होती.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती तिच्या बॉस आणि महिला मैत्रिणीसोबत कसौली येथील एका हॉटेलमध्ये राहात होती. तिथे 3 जुलै 2023 रोजी त्यांनी हरियाणा भाजपचे प्रमुख मोहनलाल बडोली आणि गायक जय भगवान उर्फ ​​रॉकी यांची भेट घेतली. दोघांनी तिला सरकारी नोकरी देतो आणि अल्बमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देतो असे आमिष दाखवले.

जेव्हा पीडिता त्यांच्या प्रभावाखाली आली तेव्हा त्यांनी तिला दारू पिण्यास भाग पाडले. पीडितेने नकार दिल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपींनी त्यांच्या गैरकृत्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यांनी पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्याही देखील दिल्या. दोन महिन्यांपूर्वी पीडितेला रॉकीच्या पंचकुला येथील घरी बोलावण्यात आले.

पीडिता त्यांनी बोलावले म्हणून पंचकुला येथे गेली. याठिकाणी तिला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. यानंतर पीडितीने या त्रासाला कंटाळून शेवटी १३ डिसेंबर २०२४ रोजी कसौली येथील पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भाजप नेता आणि रॉकीविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायक रॉकीने महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT