बायकोचं भाडेकरूसोबत अफेअर, संतापलेल्या नवऱ्याने त्याला जिवंत गाडले Saam Tv
क्राईम

Crime : बायकोचं भाडेकरूसोबत अफेअर, संतापलेल्या नवऱ्याने त्याला जिवंत गाडले

Haryana Crime News: हरियाणातील रोहतकमधील ही धक्कादायक घटना आहे. नवऱ्याला आपल्या बायकोचे आणि भाडेकरूचे प्रेम संबंध असल्याचे समजले. नवऱ्याने मित्रांच्या मदतीने बायकोच्या प्रियकराचे अपहरण करूण त्याला ७ फुट खोल खड्यात जिवंत गाडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बायकोच्या प्रेमसंबंधाची कानकुन लागताच बायकोच्या प्रियकराची मित्रांच्या मदतीने केली हत्या. एका शेतात ७ फुट खोल खड्यात बायकोच्या प्रियकराला जिवंत गाडले. हरियाणातील रोहतकमध्ये ३ महिन्यांपूर्वी एक भयानक हत्याकांड घडले होते. पोलिसांनी आता हे प्रकरण पूर्णपणे उलगडले आहे. बायकोच्या अनैतिक संबंधांमुळे नवऱ्यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. हे प्रकरण नेमकं कसं सोडवलं गेलं? चला तर मग संपूर्ण कहाणी जाणून घेऊया...

हरियाणातील रोहतकमधील ही धक्कादायक घटना आहे. नवऱ्याला आपल्या बायकोचे आणि भाडेकरूचे प्रेम संबंध असल्याचे समजले. तेव्हा नवऱ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने बायकोच्या प्रियकताचे अपहरण करूण त्याला एका शेतात ७ फुट खोल खड्यात जिवंत गाडले. पोलिसांच्या माहितीनुसार, या योग शिक्षकाची हत्या मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झाली होती. पोलिसांच्या दिर्घ तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी शेतातून या योग शिक्षकाचा मृतदेह आढळून आला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, हरदीपला समजले की त्याच्याच घरातील एका भागात भाडेकरू म्हणून राहत असलेला आणि रोहतक मधील मस्तनाथ विश्र्वविद्यालयात योग शिकवणारा जगदीप आणि त्याच्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट समजताच हरदीपने चरखी दादरीच्या पंतवास गावात सात फूट खोल खड्डा खोदण्यासाठी काही लोकांना पैसे दिले. हा खड्डा बोअरवेलसाठी असल्याचे त्याने सांगितले. परंतु त्याच्या डोक्यात भलतेच काही शिजत होते.

नेमकं प्रकरण काय आहे?

२४ डिसेंबरला हरदीप आणि त्याच्या काही मित्रांनी जगदीपचे अपहरण केले. त्याचे हातपाय बांधून त्याला मारत चरखी दादरीच्या खड्याकडे घेऊन गेले. शेतात पोहोचल्यानंतर, हरदीप आणि त्याच्या मित्रांनी जगदीपच्या तोंडावर टेप लावली जेणेकरून तो आवाज करू शकणार नाही. त्यानंतर त्याला खड्यात जिवंत गाडले आणि खड्डा मातीने भरला. हत्येच्या १० दिवसांनंतर ३ जानेवारीला शिवाजी कॉलनी पोलिस ठाण्यात जगदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

जगदीपचे अपहरण होण्यापूर्वीचे काही कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. यानंतर, हरदीप आणि त्याचा मित्र धरमपाल यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे पोलिसांना सापडले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी दोघांचीही चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्येची संपूर्ण माहिती दिली.

तीन महिन्यांनंतर मृतदेह सापडला

हत्येच्या अगदी तीन महिन्यांनंतर सोमवारी (२४ मार्चला) मृतदेह सापडला. गुन्हे अन्वेषण एजन्सी युनिटचे प्रभारी कुलदीप सिंग म्हणाले, "या प्रकरणात इतरही आरोपी आहेत, ज्यांना लवकरच अटक केली जाईल. शवविच्छेदन झाले असून आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत."

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT