Buldhana Crime : शेतीच्या वाद उफाळला; कुटुंबावर प्राणघातक हल्ला, तीनजण गंभीर जखमी

Buldhana News : सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या काहूपट्टा शिवारात घडलेल्या घटनेत भुवानसिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेतीच्या वादातून जळगाव जामोद शहरातील शब्बीर भाई आणि त्याच्या मुलाने हल्ला
Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : शेतीवरून असलेला जुना वाद उफाळून आला. या वादातून एका परिवारावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याने या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सदरची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कहुपट्टा शिवारात घडली आहे. दरम्यान मारेकरींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या काहूपट्टा शिवारात घडलेल्या घटनेत याच शिवारात भुवानसिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेतीच्या वादातून जळगाव जामोद शहरातील शब्बीर भाई आणि त्याच्या मुलाने हल्ला चढविला. या परिवाराला काही समजण्याच्या आत कुऱ्हाडीने प्राण घातक हल्ला करत सर्वानाच बेदम मारहाण केली. ह्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Buldhana Crime
Pandharpur News : विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा, ३० किलो चांदीत कोरीव काम, भक्तांनी दिलं दान

मारेकरींना अद्याप अटक नाही 

दरम्यान मारहाणीत मंगलसिंग मुजालदा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. एवढी गंभीर घटना घडल्यानंतर देखील पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आलेली नाही. परिवारावर गंभीर प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी हल्ला करणाऱ्यांना अद्यापपर्यंत अटक केली नसल्याने आरोपी शहरातच मोकाट फिरत आहे. 

Buldhana Crime
Sangli : इस्लामपूरमध्ये २८ किलो गांजा जप्त; तिघांना ताब्यात घेत साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

आदिवासी परिवाराचा पोलीस स्टेशनवर मोर्चा 

पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आदिवासीयांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच हल्ल्यातील आरोपीवर ऍट्रॉसिटी नुसार विविध गंभीर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्याल्यावर जिल्ह्यातील हजारो आदिवासी धडकतील असा इशारा आदिवासियांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com