Physical Abuse Case Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : नोकरीचं आमिष दाखवून २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार; जिम मालकाचं भयंकर कृत्य

Gym Owner Physically Abused 24 year old girl : मुंबईत एका जिम मालकाने तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. नोकरीचं आमिष दाखवून त्याने हे भयंकर कृत्य केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईत एका जिम मालकाने २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. जिम मालकाने पीडित तरूणीला नोकरी देण्याचं आमिष दाखवून मुंबईत बोलवलं. तिला एका हॉटेलमध्ये घेवून गेला अन् तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

पीडित तरूणी उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळतेय. मुंबईत (Mumbai News) एका जिम मालकाने नोकरी देण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. जिम मालकाने पीडितेला नोकरीचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्याने तरूणीला मुंबईत बोलावलं. मुंबई, गोवा आणि लखनौ येथे वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार घेवून जावून तिच्यावर बलात्कार केला.

बिझनेस मीटिंगच्या बहाण्याने मुंबईत बोलावलं

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आज तकच्य हवाल्यानुसार, ही घटना (Physically Abused) मुंबईतील जुहू भागात घडली. पीडित महिला उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. जुहू पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २०१९ मध्ये पहिल्यांदा आरोपीला भेटली होती. त्यावेळी आरोपीने तिला मुंबईत जिम उघडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं.

जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा

जिममध्ये चांगल्या पगारात नोकरी देतो, असं आश्वासन आरोपीने पीडितेला दिले होते. बिझनेस मीटिंगच्या बहाण्याने मुंबईतील जुहू येथील हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार (Mumbai Crime) केला. यानंतर आरोपीने पीडितेला गोवा आणि लखनऊ येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला, असं तिने तक्रारीमध्ये नमूद केलंय. याप्रकरणी २४ वर्षीय पीडितेने जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार (crime news) केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT