Gujarat Crime Saam tv
क्राईम

Shocking: शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडली अन्..., मुख्याध्यापकाचा खरा चेहरा समोर; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Gujarat Crime: गुजरातमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केला. शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Priya More
  • कच्छमध्ये १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवरील बलात्कार

  • शाळेच्या मुख्याध्यापकाने केलं भयंकर कृत्य

  • शाळेच्या आवारातच विद्यार्थिनीवर बलात्कार

  • शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

गुजरातमध्ये १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कच्छ जिल्ह्यातील रापर तालुक्यात ग्राम स्वराज्य संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित मुलगी आठवीमध्ये शिकते. शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडल्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलं असं की, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी करत असताना एका महिला शिक्षिकेला शाळेच्या आवारात प्रेग्नन्सी किट सापडली. त्यानंतर मुलींच्या वसतीगृहाच्या शिक्षिकेने आणि वॉर्डनने सीसीटीव्ही फुजेट तपासले तेव्हा त्यांना धक्का बसला. ती प्रेग्नन्सी किट शाळेच्या मुख्याध्यापकाच्या खिशातून पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी ट्रस्टच्या सचिवांना याची माहिती दिली. तपासादरम्यान ट्रस्टचे सचिव आणि कोअर कमिटीच्या एका सदस्याला या घटनेची माहिती मिळाली.

शाळेच्या मुख्याध्यापकाचे घर मुलींच्या वसतिगृहाजवळ आहे. असा आरोप केला जात आहे की, मुख्याध्यापकाने पीडित मुलीला १५ ऑगस्टच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर वसतिगृहामागील एका निर्जन ठिकाणी नेले होते आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, शाळा प्रशासनाने पोलिसांना माहिती देण्याऐवजी मुख्याध्यापकांना निलंबित करून आणि मुलीला तिच्या पालकांकडे परत पाठवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी शाळा प्रशासनाच्या देखरेखीखाली होती. अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल पोलिसांना माहिती देणे ही त्यांची जबाबदारी होती. या घटनेनंतर पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या मदतीने मुलीशी आणि तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. शुक्रवारी रापर पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक, वसतिगृह वॉर्डन, कोअर कमिटी सदस्य आणि ट्रस्ट सचिव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मुख्याध्यापक हा त्या शाळेचा माजी विद्यार्थी होता आणि त्याने या शाळेत २ वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

SCROLL FOR NEXT