Crime: घरात पूजा सुरू असताना गोळीबार, पत्नी अन् २ पुजाऱ्यांना संपवलं; आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची हत्या केली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.
Crime: घरात पूजा सुरू असताना गोळीबार, पत्नी अन् २ पुजाऱ्यांना संपवलं; आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
Uttar Pradesh CrimeSaam Digital
Published On
  • आझमगडमध्ये पूजेदरम्यान तिहेरी हत्याकांड

  • घरात पूजा सुरू असताना गोळीबार

  • तरुणाने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

  • आधार कार्ड मागितल्यावरून पुजाऱ्यांशी वाद

  • आझमगड हत्याकांडातील आरोपीचा पोलिस एन्काऊंटर

उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये चार जणांच्या हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका तरुणाने पत्नीसह तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. अरविंद सिंग असे आरोपीचे नाव होते. घरामध्ये पूजा करण्यासाठी आलेल्या दोन पुजारी आणि पत्नीवर त्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तिघांनी जागीच प्राण सोडले. या हत्याकांडाच्या आरोपीचं पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहरौला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंभुपूर गावात मंगळवारी संध्याकाळी तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. पूजेदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर एका रक्तरंजित थरारात झाले. बाजारातून घरी परतत असताना अरविंद सिंगने आपल्या घरी पुजारी पूजा करत असल्याचे पाहिले. अरविंदने पुजाऱ्यांकडे त्यांचे आधारकार्ड मागितले. पुजाऱ्यांनी ते देण्यास नकार दिला. यावरून पुजारी आणि अरविंद यांच्यात वाद झाला. या वादानंतर अरविंदने बंदूक काढून गोळीबार केला.

गोळीबारात जखमी झालेल्या त्याची पत्नी बबिता आणि दोन पुजारी यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी अरविंद सिंग यांच्या घरी पूजा सुरू होती. त्यावेळी चार पुजारी, अरविंद यांची पत्नी बबिता, एक मुलगा आणि एक मुलगी उपस्थित होते. अरविंद संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारातून घरी आला. घरात पूजा सुरू असल्याचे पाहून त्यांनी पुजाऱ्यांना विचारले काय सुरू आहे? पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की पूजा सुरू आहे.

त्यानंतर अरविंदने पुजाऱ्यांकडे त्यांचे आधार कार्ड मागितले. या मागणीवरून अरविंद आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर अरविंदने घरात ठेवलेली बंदूक काढून गोळीबार केला. या गोळ्यांमध्ये त्याची पत्नी बबिता, पंडित महेंद्र पाठक आणि आणखी एक पंडित जखमी झाले. या तिघांचाही अधिक रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. तिघांच्या हत्येनंतर आरोपी आपल्या ३ मुलांसह घरामध्ये बसून होता. मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला बाहेर येण्यास सांगितले. आरोपीने पोलिसांचे ऐकले नाही. त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा एन्काऊंटर केला. आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये आरोपीच्या चार वर्षांच्या मुलाचा गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. तर एका मुलीच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी, त्याची बायको, दोन पुजारी आणि एका मुलगा असे पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी मुलीला उपचारासाठी दाखल केले. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com