Haryana Ambala triple murder CCTV video saam tv
क्राईम

Crime news: थराराक! पैशांसाठी नातू हैवान झाला; आजीसह कुटुंबातील तिघांना गोळ्या झाडून संपवलं

Haryana Ambala triple murder CCTV video: हरियाणातील अंबालामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाने स्वतःच्या आजी, काका आणि मोठ्या भावावर गोळीबार केला. सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाली असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हरियाणातील अंबालामध्ये शनिवारी एका तिहेरी हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये एका नातवाने केवळ काही पैशांसाठी नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपीने अंदाधुंद गोळीबार करून स्वतःची आजी, काका आणि मोठ्या भावाला ठार केल्याचं समोर आलं आहे.

थरारक घटना कॅमेरात कैद

घराशेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला या रक्तरंजित थराराचा व्हिडीओ समोर आला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांकडून या मारेकऱ्याचा शोध सुरु आहे.

घराशेजारी लावलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अभिषेक पोटा हा निळी टोपी आणि पांढरा शर्ट घालून हातात रिव्हॉल्वर घेऊन घराकडे येताना दिसतोय. घरात कोणीही नसल्याचं पाहून तो बाहेर येतो. यावेळी बाहेर पडताच त्याला त्याची वृद्ध आजी दिसते. अभिषेक जराही विचार न करता तिच्याजवळ जातो आणि तिच्यावर गोळी झाडतो. गोळी झाडल्यानंतर आजी जमिनीवर कोसळते आणि तिचा जागीच मृत्यू होतो.

आरोपी अभिषेक इतक्यावरच थांबला नाही. त्यानंतर तो इतरांना शोधण्यासाठी निघतो. दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य धावत बाहेर पळून जातात. यावेळी त्याचे काका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अभिषेकच्या हातातील बंदूक पाहून ते घाबरून निघून जातात. पण अभिषेक त्यांच्यावरही गोळी झाडतो. जी थेट त्यांच्या छातीत लागते. त्यानंतर मोठ्या भावावर गोळी झाडून आरोपी तिथून फरार होतो.

या अंदाधुंद गोळीबारामुळे गावातील लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी या रक्तरंजित घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आजीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवला.

गंभीर जखमी झालेले काका, काकू आणि मोठा भाऊ संदीप यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंदीगड पीजीआयमध्ये हलवण्यात आलं. तर रूग्णालयात नेईपर्यंत काका आणि भावाचा मृत्यू झाला. काकूंची प्रकृती चिंताजनक असून त्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बिचपडी गावातील जमिनीतून माती काढण्याचं कंत्राट सुरू होतं. या कंत्राटातील त्यांच्या वाट्यावरून काही काळापासून कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. शनिवारी संध्याकाळी सुमारे साडेचार वाजता पुन्हा एकदा जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, अभिषेक संतापला आणि त्याने कुटुंबातील व्यक्तींवर थेट गोळ्या झाडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT