gobarwahi police arrests three youth from chikhala in theft case saam tv
क्राईम

Bhandara Crime News : चिखला खाण परिसरात चाेरी करणारी टाेळी जेरबंद, गाेबरवाही पाेलिसांची कामगिरी

गाेबरवाही पाेलिस चाेरट्यांची कसून चाैकशी करीत आहेत.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

मॉयल लिमिटेड चिखला (Chikhala) खाण परिसरात तब्बल ७४ हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गाेबरवाही पाेलिसांनी (gobarwahi police) मोठ्या शिताफीने पकडले. राहुल झोडे, यशवंत सोनवाणे व समीर शेख (सर्व राहणार. चिखला) अशी या चोरट्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

चिखला खाण परिसर मोठे असून चोरीच्या घटना घडत असतात. या परिसरातून ६० मीटर कॉपर केबल, ५ टन क्षमतेचे हैंगिंग चेन, हायड्रोलिक पंप, गाइड रेल शु फुटवाल, २४ नग फलांज, तीन केज चेन, नट बोल्ट, रोप रिकेपिंग बैंड, स्लिब व वाइंडर मशीन यासह अन्य साहित्य चोरी करून नेत असताना खाण येथील सुरक्षा रक्षक अधिकारी रामेश्वर बर्वे यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती खाण प्रशासनाला दिली. तसेच क्षणाचाही विलंब न लावता गोबरवाही पोलिसांना माहिती देण्यात आली. गोबरवाही पोलिसांनी मोठ्या शिताफीने या तिघांनाही खाण परिसरात पकडले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास गाेबरवाही पाेलिस करीत आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

SCROLL FOR NEXT