Crime News Saam Tv
क्राईम

Goa Crime News: पोटच्या ४ वर्षीय मुलाची गोव्यात हत्या, कर्नाटकात पोहोचली; यशस्वी उद्योजिकेच्या चेहऱ्यामागील क्रूर आईची कहाणी

Crime News: गोव्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका स्टार्टअपच्या सीईओने आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. मुलगा वडिलांना भेटू नये, म्हणूनच आईने मुलाची हत्या केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A CEO Of Startup Killed Her Son:

गोव्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका स्टार्टअपच्या सीईओने आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या केली आहे. मुलगा वडिलांना भेटू नये, म्हणूनच आईने मुलाची हत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सूचना सेठ असे आरोपीचे नाव आहे. सूचना बेंगळुरुमधील एका स्टार्टअपच्या सीईओ आहे. सूचनावर आपल्या ४ वर्षीय मुलाची हत्या केलाचा आरोप आहे. सूचनाने गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह एका बॅगेत ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सूचनाला अटक केली आहे. (Latest News)

२०१० मध्ये सूचनाचे लग्न झाले होते. २०१९ मध्ये त्यांना मुलगा झाला. २०२० मध्ये काही कारणांनी सूचना आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला. यावेळी मुलगा दर रविवारी आपल्या वडिलांना भेटेल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु सूचनाला हे मान्य नव्हते. पतीला मुलापासून वेगळे ठेवण्यासाठी तिने हा टोकाचा निर्णय घेतला.

सूचना मुलाला घेऊन गोव्याला फिरण्यासाठी आली. ती आणि तिचा मुलगा कँडोलिम येथे एका हॉटेलमध्ये राहत होते. याच हॉटेलमध्ये सूचनाने आपल्या मुलाची हत्या केली. धारदार शस्त्राने मुलाची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह एरा बॅगेत ठेवला. कोणालाही संशय होऊ नये म्हणून सूचनाने हॉटेलचा रुम स्वच्छ केला. त्यानंतर ती हॉटेलमधून चेकआउट करुन निघाली. त्यावेळी हॉटेल स्टाफने तुमचा मुलगा कुठे आहे, असे विचारले. तेव्हा मुलगा आधीच गेल्याचे तिने सांगितले.

एका टॅक्सीत बसून सूचना निघून गेली. परंतु, सूचनाच्या या वागण्याचा हॉटेल स्टाफला संशय आहे. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुममध्ये जाऊन चेक केले. तेव्हा त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले. हॉटेलच्या मॅनेजरने तातडीने पोलिसांना फोन केले.

याप्रकरणी गोवा पोलिसांनी तपास घेण्यास सुरुवात केली. सूचना ज्या टॅक्सीतून गेली होती. त्या टॅक्सीचा नंबर मिळवला. पोलिसांना टॅक्सीचालकाला फोन करुन कारमध्ये मॅडम आहेत का? अशी विचारणा केली. त्यावेळी सूचना टॅक्सीतच होती. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरुन टॅक्सी चालकाने सूचनाला जवळच्या पोलिस ठाण्यात सोडले. पोलिसांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात आहे. गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सूचनाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या मुलाला भेटू नये असे सूचनाला वाटत होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तिला काहीच करता येत नव्हते. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या मुलाची हत्या केली. सूचनाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT