Glass bottle stuck inside body saam tv
क्राईम

Glass bottle incident: तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली काचेची बाटली, त्रास होऊ लागल्याने तरूण पोहोचला रूग्णालयात अन्..!

Glass bottle stuck inside body: पलामूमध्ये एका तरुणाच्या शरीरात काचेची कोल्ड ड्रिंक बाटली अडकल्याने खळबळ उडाली. डॉक्टरांनी 30 मिनिटांच्या प्रयत्नानंतर बाटली सुरक्षित बाहेर काढली. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडूनही चौकशी केली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पलामू जिल्ह्यातील मेदिनीराय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये गुरुवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. प्रायव्हेट पार्टमध्ये काचेची कोल्ड ड्रिंकची बाटली अडकल्यामुळे एका तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास अर्धा तास प्रयत्न करून ही बाटली बाहेर काढली असून सध्या तरुणावर उपचार सुरू आहेत.

प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली कोल्ड ड्रिंकची बाटली

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पडवा पोलीस ठाणे हद्दीतील झरी लामी पतरा गावचा रहिवासी आहे. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 200 एमएलची कोल्ड ड्रिंकची काचेची बाटली अडकली. यामुळे त्या तरूणाला गंभीर त्रास होऊ लागला. त्यानंतर तो उपचारासाठी मेदिनीराय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

रुग्णालयातील डॉक्टर सुमित कुमार यांनी सांगितलं की, तरुणाच्या मलद्वारातून काचेची बाटली आत गेली होती. डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्यावर उपचार केले. विशेष पंपाच्या मदतीने सुमारे 30 मिनिटांच्या प्रयत्नानंतर बाटली सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. सध्या तरुणाला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं असून त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

तरूण स्वतः पोहोचला रूग्णालयात

गुरुवारी तरुण स्वतः मेडिकल कॉलेजमध्ये आला होता आणि त्याने डॉक्टरांना त्रासाबद्दल माहिती दिली. मात्र ही बाटली नेमकी आत कशी गेली, याबाबत तो डॉक्टरांनाही आणि पोलिसांनाही काही स्पष्ट सांगू शकलेला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तो सध्या बोलण्याच्या स्थितीतही नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही चौकशी सुरू केलीये. पडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी चिंटू कुमार यांनी सांगितलं की, तरुणाने दिलेल्या नाव आणि पत्त्याची पडताळणी सुरू आहे. सध्या तो उपचार घेत असल्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT