Ganesh visarjan x
क्राईम

Ganpati visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्येचा थरार, तरुणावर चाकूने वार; घटनेचा Video Viral

Crime Youth Death : गणेश विसर्जन मिरवणुक यात्रेदरम्यान एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

Yash Shirke

  • गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान २१ वर्षीय तरुण बॉबीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला.

  • गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या बॉबीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • पोलिसांनी आरोपींना अटक केली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Crime News : गणेश विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यानंतर तरुण गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेतील तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मेरठमधील सरधना पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (६ सप्टेंबर) सरधना पोलीस स्टेशन परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक काढली जात होती. यादरम्यान दुचाकीवरुन आलेल्या काहीजणांना बॉबी नावाच्या २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी झालेल्या बॉबीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना बॉबीचा मृत्यू झाला.

बॉबीचा शेखर नावाच्या तरुणाशी वाद होता. जिमला जाताना दोघांमध्ये एका गोष्टीवरुन वाद झाला. शेखरने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बॉबीवर चाकूने वार केला. त्यानंतर त्याने गर्दीचा फायदा घेत बाईकवरुन पळ काढला असा आरोप बॉबीच्या कुटुंबियांनी केला आहे. भर मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

घटनेशी संबंधित उपलब्ध व्हिडीओच्या आधारे बॉबीच्या कुटुंबियांनी दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सरधना पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. इतर दोन संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुतीला यश मिळणार की ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार?

IND Vs PAK Final : ए चल... भारताला चौथा धक्का बसला अन् अबरार अहमदनं पुन्हा केलं वादग्रस्त सेलिब्रेशन, Video

Maharashtra Politics : 'कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाका'; ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर संताप, VIDEO

Suryakumar Yadav आउट की नॉट आउट? चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता का? Video

India vs Pakistan : पाकिस्तानने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं; भारताचे ३ तगडे फलंदाज तंबूत परतले

SCROLL FOR NEXT