
अजित पवारांनी IPS महिला अधिकाऱ्याला दम दिल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली.
लक्ष्मण हाके म्हणाले, 'अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. तुमची भाषा सुधारा'
अमोल मिटकरींनाही 'रॉकेल चोर' म्हणत लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधला.
विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी
Laxman Hake on Ajit Pawar IPS Anjana Krishna : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील डीएसपी अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत. आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अजित पवार आयपीएस अंजना यांना फोनवरुन तंबी देत असल्याचे पाहायला मिळते. या प्रकरणावरुन अजित पवारांवर टीका होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. त्यांनी शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे त्यांना शोभत नाही. त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल, तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये, असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
अजित पवार, तुम्हाला बाबासाहेब वगैरे कळणार नाही. तुमची कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं? असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अजित पवार यांच्यासह अमोल मिटकरी यांच्यावर हाके यांनी टीकास्त्र सोडले आहे. लक्ष्मण हाके यांनी मिटकरींना 'रॉकेल चोर' म्हटले आहे.
अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर वरिष्ठ सभागृहात पाठवला. त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. त्या अमोल मिटकरीमुळे तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार? अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठापासून ग्रॅज्युएट झाला आणि त्याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केले. यूपीएससीचा लाँग फॉर्मतरी माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्याही समाजाला टार्गेट करतो. अजित दादा तुम्हाला अमोल मिटकरणी तोंड काळं करायला लावणार, असे लक्ष्मण हाके म्हटले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.